Share

सेंगरला वाचवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न; सीबीआयचा खळबळजनक खुलासा

Published On: 

उन्नाव – उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरवर केलेल्या आरोपांना सीबीआयने दुजोरा दिला आहे. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी सेंगरला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचेही सीबीआयने म्हंटले आहे . उत्तर प्रदेशातील माखी गावात राहणाऱ्या या पीडितेने कुलदीप सिंह सेंगरने मागच्यावर्षी चार जूनला घरात घुसून आपल्यावर बलात्कार केला त्यावेळी त्याची महिला साथीदार शशी सिंह दरवाजाबाहेर पहारा देत होती असा आरोप केला होता. या आरोपाला सीबीआयने दुजोरा दिला.

या प्रकरणात उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली. सरकार आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे आरोप झाल्यानंतर निष्पक्ष तपासासाठी राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. उत्तर प्रदेशातील बांगरमऊ येथून आमदार असलेल्या कुलदीप सिंह सेंगरवर पीडित तरुणीने सुरुवातीपासून बलात्काराचा आरोप केला आहे.

या प्रकरणी २० जूनला एफआयआर आणि त्यानंतर दाखल झालेल्या आरोपपत्रात स्थानिक पोलिसांनी कुलदीप सिंह सेंगर आणि अन्य आरोपींच्या नावाचा समावेश केला नाही. सीबीआयने कलम १६४ अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे पीडित तरुणीची जबानी नोंदवून घेतली. ही जबानी देताना पीडित तरुणी तिच्या आरोपांवर ठाम होती. कलम १६४ अंतर्गत नोंदवलेली जबानी कोर्टापुढे पुरावा म्हणून ग्राहय धरली जाते.

स्थानिक पोलिसांनी पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीला विलंब केला तसेच तिचे कपडे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले नाहीत.आरोपींशी हातमिळवणी करुन जाणीवपूर्व सर्व गोष्टींना विलंब लावण्यात आला असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!