नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ जून पर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या शहरांमध्ये (१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका) आणि जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली असेल त्यांना अधिक शिथिलता देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे आता ज्या जिल्ह्यांमध्ये वा शहरांमध्ये पॉझिटिव्हिटी रेटनुसार आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना लागू केल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्याचा आढावा बैठक आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांहून कमी असल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे.
आता सलून, कपड्याचे दुकान, सराफा दुकानं उद्यापासून सुरू होणार आहेत. त्यांना नियमांचे पालन काटेकोरपणे करावे लागणार असून सकाळी सात वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत दुकानं उघडता येणार आहे.
जाणून घ्या काय सवलत देण्यात आली आहे ?
- आस्थापना दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार.
- भाजीपाला विक्री 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार.
- शिवभोजन 10 ते 2 पार्सल सेवा सुरू राहणार.
- अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी.
- दुपारी 3 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी बंदी लागू राहणार.
- अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यासाठी परवानगी नाही.
- शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहतील.
- बँक सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार.
- 15 जूनपर्यंत निर्बंध लागू राहणार.
- सलून, कपड्याचे दुकाने, सराफ व्यावसायिकांची दुकानं उद्यापासून सुरू होणार.
महत्वाच्या बातम्या
- ‘नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला’
- पुणेकरांना मोठा दिलासा; पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून खाली ! लवकरच ‘हे’ नियम लागू होणार
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- ‘दिल्लीत गेल्यावर मोदींना ‘तेवढं’ नक्की सांगा’, अजितदादांचे आठवलेंना साकडे
- ‘माझं गाव कोरोनामुक्त हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

