Share

“राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते” – गुलाबराव पाटील आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट टीका केली आहे. म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी पाहिला आहे. ज्या प्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. तसे राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. अशी सडेतोड टीका केली.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, मनसे स्थापन करताना उत्तर प्रदेशातील लोकांना ठोकलं. पक्ष स्थापन झाल्यावर हम सब भाई आहे. आता काहीच हातात लागत नाही म्हणून हिंदुत्वाकडे टर्न केला. नंतर त्यांना चमत्कार झाला. मोदींकडे गुजरातला गेले. आता मोदींवर टीका केली बारामतीत गेले, शरद पवारांची मुलाखत घेतली. आता शरद पवार वाईट झाले. हा सिझनेबल कार्यक्रम आहे, कोणत्याच ऋतूत काहीच मिळत नाही.

“पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही, मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो”. म्हणून ही धडपड आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी बोलत असताना केली.  तसेच “राज ठाकरेंना मी लहानपणापासून ओळखतो. हाफ चड्डीपासून मी शिवसैनिक आहे. तेव्हा पासून ते आमच्या जिल्ह्यात यायचे. चंचल माणूस आहे, चंचल स्वभावामुळे या गोष्टी होत असतात”, असा थेट टोला पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या –

नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधान
“समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां” – चित्रा वाघ संतापल्या
मनसे नेत्याने ‘अजान’च्या निषेधार्थ लाऊडस्पीकरवर वाजवली ‘हनुमान चालिसा’, मुंबई पोलिसांनी ठोठावला दंड
प्रभाकर साईलमुळे समीर वानखेडेंचा मुखवटाच फाटला- संजय राऊत
“त्यांनी हनुमान चालिसा जरुर लावावी पण…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!