🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. “ही राजकीय बैठक नव्हती. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांशी माझे चांगले संबंध आहेत. मी त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी आणि त्यांच्या आईची प्रकृती जाणून घेण्यासाठी आलो होतो” असे नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या घरी भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या आणि मनसेला भाजपची बी टीम असंही संबोधण्यात आलं.
त्यानंतर काल राज ठाकरेंच्या भेटीला नितीन गडकरी गेल्यामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांत भाजप-मनसे युती होणार का? अशी ही चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
“समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां” – चित्रा वाघ संतापल्या
मनसे नेत्याने ‘अजान’च्या निषेधार्थ लाऊडस्पीकरवर वाजवली ‘हनुमान चालिसा’, मुंबई पोलिसांनी ठोठावला दंड
प्रभाकर साईलमुळे समीर वानखेडेंचा मुखवटाच फाटला- संजय राऊत
“त्यांनी हनुमान चालिसा जरुर लावावी पण…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
प्रभाकरच्या सत्य कथनाने कित्येक आर्यन खान बळी जाण्यापासून वाचले- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
