बीड : 22 वर्षीय पूजा चव्हाणचा पुण्यातील वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राठोडांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेला आहे.
शिवसेनेच्या बड्या नेत्याचे नाव आल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता.भाजपच्या महिला आघाडीने या प्रकरणी राज्यभर आंदोलने केली.भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने राठोड यांना राजीनामा द्यावा लागला असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात बड्या मंत्र्याचे नाव आल्याने देशभरातील प्रसिद्धीमाध्यमांमध्ये या प्रकरणाला प्रसिद्धी मिळाली होती. मात्र तरुणीच्या आत्महत्येबाबत व तिच्या प्रेमसंबंधांबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त येत असल्याने तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून आता उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना अनावश्यक प्रसिद्धी देऊ नका असे निर्देश दिले आहेत.
तर दुसरीकडे ‘तुझ्या बहिणीबद्दल बोलयाचे आहे’ असे सांगून पूजा चव्हाणच्या बहिणीला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका युवतीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत पळ काढल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या तरुणीचा पोलीस शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक 04 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास परळीतील फाऊंडेशन शाळेजवळ घडली. पूजाची बहिण दिव्यांगा लहू चव्हाण हिचा मोबाईल चोरण्यात आला आहे. दिव्यांगा ही दहावीत शिकत आहे. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती आणि तिचा मित्र सौरभ कराड हे दोघे परळीतील हनुमान गड परिसरात गेले होते.
त्यावेळी दिव्यांगाला एका अनोळख्या क्रमांकावरून फोन आला. तीने पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल काही तरी बोलायचे आहे, असं सांगितलं. त्यानंतर दिव्यांगा आणि सौरभ हे दोघे फाऊंडेशन शाळेजवळ पोहोचले. त्यावेळी अनोळख्या तरुणीने पुन्हा एकदा फोन करून दोघांना शाळेच्या दुसऱ्या गेटजवळ बोलावले. दिव्यांगा फोनवर बोलत येत असताना समोरून आलेल्या अनोळख्या तरुणीने अचानक तिच्या हातातून मोबाईल हिसाकवला आणि पळ काढला. सौरभ आणि दिव्यांगाने तिचा पाठलाग केला. पण, काही अंतरावरच अनोळखी तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून फरार झाली.
महत्वाच्या बातम्या
- भाजपनंतर ‘महाविकास’कडूनही धनगर समाजाची अवहेलना, धनंजय मुंडेंची खंत
- भोसरीत भाकरी फिरणार; भावकीतील युवा नेत्यामुळे महेशदादांची डोकेदुखी वाढणार ?
- मांजरेकर रहाणेच्या बॅटिंगवर नाराज, म्हणाले…
- ‘कथित’ बंगला, ‘कथित’ पावती, २०१३ च्या छाप्याची आठवण’ आयकर छाप्यानंतर तापसी पन्नुची प्रतिक्रिया
- पूजा चव्हाणच्या कथित अनैतिक संबंधांना अनावश्यक प्रसिद्धी देऊ नका, उच्च न्यायालयाचे प्रसारमाध्यमांना निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

