Share

भोसरीत भाकरी फिरणार; भावकीतील युवा नेत्यामुळे महेशदादांची डोकेदुखी वाढणार ?

Published On: 

पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय आखाडा म्हणून भोसरी विधानसभा मतदार संघाकडे पाहिलं जातं. या मतदारसंघात अनेक पैलवानांनी राजकीय दबदबा निर्माण केलं आहे. अगदी भाजपचे पहिले शहराध्यक्ष पै. अंकुशराव लांडगे यांच्यापासून ते भोसरीचे विद्यमान आमदार व भाजपचे शहराध्यक्ष पै. महेश लांडगे यांच्यापर्यंत! राष्ट्रवादी काँग्रेसचा खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची लाट आली आणि महापालिकेची सत्ता ते आमदारकी पर्यंत राष्ट्रवादीला धक्का सहन करावा लागला.

२०१४ मध्ये राष्ट्रवादीमधून असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर राष्ट्रवादीशी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार महेश लांडगे यांनी २०१६ मध्ये भाजप मध्ये प्रवेश केला. साहजिकच, या दोन्ही आमदारांचा राष्ट्रवादीतील समर्थक गट देखील भाजपमध्ये आला. त्यामुळे २०१७ मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने बहुसंख्य आयारामांना उमेदवारी दिली. यामुळे भाजपचे जुने कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आली खरी मात्र या दोन आमदारांच्या समर्थकांचा गट आणि निष्ठावंत गट अशी विभागणी अंतर्गत भाजपमध्ये झाली.

हा संघर्ष महापौर, उपमहापौर पदापासून ते स्थायी समितीच्या निवडणुकांपर्यंय वेळोवेळी दिसून आला आहे. महापालिकेच्या निवडणूक पुढील वर्षी येत असल्याने तिजोरीच्या किल्ल्या कोणाकडे जाणार यावरून चुरस निर्माण झाल्याचे दिसून आले. आमदार महेश लांडगेंच्या गटातील नितीन लांडगे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली असली तरी अनेक इच्छुकांना डावलण्यात आल्याने नाराजी उफाळून आली आहे.

यात निष्ठावंत गटाचे प्रमुख नेते व बिनविरोध नगरसेवकपदी विराजमान झालेले रवी लांडगे यांचं नाव आघाडीवर आहे. रवी लांडगे यांचे वडील हे दोन वेळा नगरसेवकपदी विराजमान झाले होते. तर, त्यांचे चुलते पै. अंकुशराव लांडगे हे पिंपरी-चिंचवड भाजपचे पहिले शहराध्यक्ष होते. आता, रवी लांडगे यांना डावलण्यात आल्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रचंड हालचाल वाढत असल्याची दिसून येत आहे. यामुळे भोसरीमध्ये रवी लांडगे यांच्या रुपाने युवा नेतृत्व उभं राहण्याची चिन्हे आहेत. या भागातील भावकी देखील आता रवी लांडगे यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रवी लांडगे यांनी भविष्यात महेश लांडगे यांच्या विरोधात शड्डू ठोकून मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणतील असे म्हटले तर वावगे वाटण्याजोगे नाही.

‘भोसरीचे पुढील आमदार रवी लांडगेच होणार ही काळ्या दगडावरची रेघ’ अशा शेकडो पोस्टचा पूर आल्याचं सोशल मीडियामध्ये दिसून येतंय. २०१९ विधानसभेवेळी गावकी-भावकीच्या साक्षीने महेश लांडगे यांनी रवी लांडगे यांना स्थायी सभापतीचा शब्द दिला होता. मात्र, ऐनवेळी महेश लांडगे यांनी पलटी मारल्याचे दिसून आले. त्यामुळे आता रवी लांडगे २०१९ मध्ये हुकलेल्या आमदारकीच्या संधीनंतर आता काय राजकीय पावले टाकणार याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. सद्या, युवकांपासून ते वृद्धांपर्यंत रवी लांडगे यांना ‘आपलं नेतृत्व’ म्हणून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी-चिंवड महापालिका निवडणूक आणि नाराजी !

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पिंपरी विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे निवडून आले. तर, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अजित पवार हे देखील पुन्हा एकदा बालेकिल्ला ताब्यात मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. अशातच, भाजपमधील नाराजी वाढत आहे. ही नाराजी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार अशी चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी तर १२-१५ नाराज नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं सांगत ‘सांगली पॅटर्न’ची पुनरावृत्ती होईल असं सांगितलं होतं. भाजपने स्थायी समिती निवडणुकीत विजय मिळवला असला तरी नाराज नगरसेवकांमध्ये रवी लांडगे यांची मोठी भर पडली असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याच्या चर्चा देखील आहेत. त्यामुळे भोसरीमध्ये पुन्हा जम बसवण्यासाठी रवी लांडगे यांची राष्ट्रवादीला साथ मिळाल्यास महेश लांडगे यांची डोकेदुखी वाढू शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!