मुंबई : 22 वर्षीय पूजा चव्हाणचा पुण्यातील वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राठोडांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेला आहे.
शिवसेनेच्या बड्या नेत्याचे नाव आल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता.भाजपच्या महिला आघाडीने या प्रकरणी राज्यभर आंदोलने केली.भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने राठोड यांना राजीनामा द्यावा लागला असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात बड्या मंत्र्याचे नाव आल्याने देशभरातील प्रसारमाध्यमांमध्ये या प्रकरणाला प्रसिद्धी मिळाली होती. मात्र तरुणीच्या आत्महत्येबाबत व तिच्या प्रेमसंबंधांबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त येत असल्याने तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून आता उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना अनावश्यक प्रसिद्धी देऊ नका असे निर्देश दिले आहेत.
पुण्यातील तरुणीचे बहुचर्चित आत्महत्या प्रकरण व तिच्या कथित अनैतिक संबंधांना अनावश्यक प्रसिद्धी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिले. तरुणीच्या आत्महत्येबाबत व तिच्या प्रेमसंबंधांबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त येत असल्याने तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती. तरुणीच्या वडिलांच्या वतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
पुण्याच्या घरातील बाल्कनीत उभी असलेली तरुणी पाय घसरून खाली पडली. यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लगेच प्रसारमाध्यमांनी २३ वर्षीय तरुणीचे एका राजकीय व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. हे वृत्त बदनामीकारक आहे. तसेच तरुणीचे अज्ञात व्यक्तीबरोबर झालेले संभाषण राजकीय व्यक्तींनी व प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले, अशी माहिती गुप्ते यांनी उच्च न्यायालयाला दिली.
गुप्ते यांनी दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांनी कसे वार्तांकन करावे, याबाबत आखलेली मार्गदर्शक तत्त्वे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सकृतदर्शनी याचिकाकर्त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असे म्हणत न्यायालयाने सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश प्रसारमाध्यमांना दिले.
महत्वाच्या बातम्या
- हिंदूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव
- स्वॅब न देताच रुग्ण येत आहेत कोरोना पॉझिटिव्ह; बुलढाण्यातील अजब प्रकार समोर !
- ‘जे काही शिकलो ते तुम्हाला पाहूनच’ ; ‘या’ दिग्ग्जच्या कौतुकानंतर रिषभची प्रतिक्रिया
- ‘कोविड नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून चाचण्यांचे प्रमाण वाढवा’
- कोट्यावधीच्या जागेवरील अनधिकृत व्यापारी संकुल प्रकरणी जि.प. सदस्य आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

