Share

अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा; शैक्षणिक फीस व परीक्षा शुल्क माफीचा निर्णय!

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दिलासादायक निर्णय घेतला आहे. विद्यापीठ परिसरातील विभागात येणार्‍या अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फीस व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय अधिसभा बैठकीत सदस्यांनी एकमताने घेतला आहे, अशी माहिती प्रा. राजेश करपे यांनी दिली. या निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ८ ऑक्टोबर रोजी अधिसभा बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिसभा सदस्य उपस्थित होते. मराठवाड्यात अतिवृष्टीचे संकट कायम आहे. शेतकर्‍यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्‍यांचा तोंडचा घास पावसाने हिरवला आहे.

सततच्या पावसाने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना उद्धवस्थ केले आहे. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी अधिसभा सदस्यांनी केली होती. याचा विचार करून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या भागातील अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याच्या मागणीला या बैठकीत मंजूरी दिली, अशी माहिती प्रा. राजेश करपे यांनी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!