Share

आघाडीच्या सर्वच नेत्यांची उस्मानाबादेत रॅली मात्र, बंदला संमिश्र प्रतिसाद

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद :  जिल्ह्यात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत संपूर्ण उस्मानाबाद शहरात रॅली काढली.

रॅलीला सुरूवात करण्यापूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मोटासायकल वरती बसून संपूर्ण शहरात साधारण अडीच तास ही रॅली काढून व्यावसायिकांना आणि दुकानदारांना दुकाने बंद करण्याचं आवाहन करण्यात आले.

लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काढलेल्या या फेरीत उस्मानाबादचे आमदार कैलास घाडगे -पाटील हे देखील सहभागी झाले होते. आमदार पाटिल यांनी उस्मानाबाद शहरात फेरी मारून व्यापाऱ्यांना बंद पाळण्याची विनंती केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्याकडून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!