🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. परंतु भाजपाकडून या बंदवरून महाविकास आघाडीवर जोरादार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, ‘हा बंद म्हणजे ढोंगीपणा आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याच पार्श्वभुमीवर फडणवीसांच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधतांना पटोले म्हणाले की,’महाराष्ट्राच्या जनतेने बंदला जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. भाजपाने ज्या पद्धतीने या बंदला विरोध केला, खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचं, या देशाच्या अन्नदात्यावर गाडी चालवून त्यांना जीवे मारण, हा पद्धतीच्या हत्यारी व्यवस्थेला महाराष्ट्र भाजपा समर्थन करत असेल, तर ही बाब निषेधार्ह आहे. म्हणून आज ज्या पद्धतीने भाजपाने आजच्या बंदला विरोध केला, त्याचाही आम्ही निषेध करतो’ असे ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’रस्त्यावर ते उतरले नाहीत, त्यांना रस्त्यावरील घटना माहिती नाही. रस्त्यावर ज्यावेळी लोकं या बंदला प्रतिसाद देत होते, ते त्यांनी पाहिलं नसेल म्हणून अशा पद्धतीनचं वक्तव्य भाजपाकडून केलं जात आहे. शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना ढोंगीपणाच वाटेल. कारण, की शेतकऱ्यांची हत्या करणं हा भाजपाचा आता धंदा झालेला आहे. शेतकरी विरोधी धोरण, केंद्र सरकारमधून तीन काळे कायदे करणे आणि मग शेतकरी हितासाठी जे कुणी लढेल त्यांच्यासाठी तो ढोंगीपणाच असतो’ असेही यावेळी पटोले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’
- भारतात आजसारखे निर्णायक सरकार कधीच नव्हते- पंतप्रधान मोदी
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’


