औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दिलासादायक निर्णय घेतला आहे. विद्यापीठ परिसरातील विभागात येणार्या अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फीस व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय अधिसभा बैठकीत सदस्यांनी एकमताने घेतला आहे, अशी माहिती प्रा. राजेश करपे यांनी दिली. या निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ८ ऑक्टोबर रोजी अधिसभा बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिसभा सदस्य उपस्थित होते. मराठवाड्यात अतिवृष्टीचे संकट कायम आहे. शेतकर्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्यांचा तोंडचा घास पावसाने हिरवला आहे.
सततच्या पावसाने मराठवाड्यातील शेतकर्यांना उद्धवस्थ केले आहे. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणार्या अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी अधिसभा सदस्यांनी केली होती. याचा विचार करून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाअंतर्गत येणार्या भागातील अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याच्या मागणीला या बैठकीत मंजूरी दिली, अशी माहिती प्रा. राजेश करपे यांनी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार’, पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- आघाडीच्या सर्वच नेत्यांची उस्मानाबादेत रॅली मात्र, बंदला संमिश्र प्रतिसाद
- जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या; एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन
- ‘नेतेगिरीचा अर्थ कुणालाही फॉर्च्युनरने चिरडणे नाही,’ भाजपा नेत्याचा घरचा आहे
- देशात लोकशाही राहिली नाही असेच चित्र; खासदार फौजिया खान यांचा केंद्र सरकारवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

