Share

विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? उदय सामंतांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

Published On: 

मुंबई: राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच आता विद्यापीठ, कॉलेज सुरु राहणार की बंद याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister of Higher and Technical Education Uday Samant) यांनी आज तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

आज दुपारी १२ वाजता राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली आहे. उदय सामंत या बैठकीत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोरोनाची स्थिती आणि इतर बाबींची माहिती घेणार आहेत. शैक्षणिक पुढील धोरण काय असावे याबाबत देखील चर्चा होणार आहे. या बैठकीला विभागाचे प्रधान सचिव व संचालक देखील उपस्थित असणार आहेत. सदरील बैठक ऑनलाईन होणार असल्याचे उदय सामंत यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरु आणि शिक्षण विभागाचे अधिकारी हे आजच्या बैठकीत अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळते आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!