जळगाव : मागील काही दिवसांपासून जळगावमध्ये राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका रंगलेल्या बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) आणि भाजप खासदार उन्मेष पाटील(Unmesh Patil) यांच्यात नव्या वादाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. गिरणा परिक्रमेच्या सुरुवातीलाच उन्मेष पाटलांनी एका पत्रकार परिषदेमध्ये वाळू चोरीच्या मुद्द्यावर बोलत असतांना गुलाबराव पाटलांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, या टीकेवर आता गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले असून ‘नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो, हे तर चिल्लर आहेत,’ असे म्हंटले आहे.
यावेळी बोलत असतांना गुलाबराव पाटील म्हणाले की,’वाळू उपशाचा प्रश्न आताचं निर्माण झालेला नाही. वाळू माफियामध्ये चेतन शर्मा कोणत्या पक्षाचे होते हे खासदारांनी पाहावं. परंतु, खासदारांना गुलाबराव पाटील नावाचा रोग झालेला आहे. परिक्रमा करायची असेल तर नदीच्या काठावरुन फिरायला लागतं. तसेच आपल्याकडून काहीच होत नाही. त्यांना जिल्ह्यात कुणी विचारत नाही, म्हणून गुलाबराव पाटील नावाचा जप करताय. मागेच मी सांगितलंय की त्यांनी माझ्या नादी लागू नये, नारायण राणे(Narayan Rane) सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत’, असे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, एका पत्रकार परिषदेत बोलत असतांना उन्मेष पाटील म्हणाले होते की,’पालक या शब्दाचा अर्थ समजून घेतला असता तर या बाबी समोर आल्या असत्या. कुंपणच शेत खात असेल तर व्यथा कुणाकडे मांडायाच्या अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या बाबतीत लोकांमधून आवाज उठवता येईल. पालकमंत्र्यांना १२ महिने झाले आहेत तरी बैठक घ्यायला वेळ नाही’, असे उन्मेष पाटील म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल- विजय वडेट्टीवार
- “तुम्ही खरे की उद्धव ठाकरे?”; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल
- विराट कोहली माध्यमांसमोर कधी येणार?; राहुल द्रविडने केला खुलासा
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

