मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांना मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल(Iqubal chahal) यांनी लॉकडाऊन संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना इकबाल चहल म्हणाले की,’महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या २० हजारांवर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल.’ तसेच पुढे ते म्हणाले की,’मुंबईचा कोरोना आकडा आठ हजारांवर गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याला कोरोनापासून दूर कसं राहता येईल हे पाहावे. महापालिकेकडे ३० हजार पेक्षा जास्त खाटा सध्या उपलब्ध आहेत. तीन हजार खाटा सध्या भरलेल्या असून औषधे आणि व्हेंटीलेटर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
#CoronavirusUpdates
3rd January, 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 8082
Discharged Pts. (24 hrs) – 622Total Recovered Pts. – 7,51, 358
Overall Recovery Rate – 93%
Total Active Pts. – 37274
Doubling Rate – 138 Days
Growth Rate (27 Dec – 2 Jan)- 0.50%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 3, 2022
दरम्यान, काल(३ जाने.)मुंबईत ८ हजार ८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सोमवारी(२ जाने.) ६२२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची रुग्णसंख्या आता ५७८ वर पोहोचली असून २५९ रुग्ण बरे झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- उन्मेष पाटील यांच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले,’हे तर चिल्लर…’
- “तुम्ही खरे की उद्धव ठाकरे?”; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल
- विराट कोहली माध्यमांसमोर कधी येणार?; राहुल द्रविडने केला खुलासा
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण


