Share

केंद्रीय भाजप मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले, परिसरात जमावबंदी लागू

Published On: 

लखनऊ : लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. ही धक्कादायक घटना लखीमपूर खेरीमध्ये घडली आहे. दरम्यान या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.

याठिकाणी प्रशासनाने 144 कलम लागू केलं असून विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतली आहे.

तर शेतकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते. जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून उठणार नाही. अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान राकेश टिकेत यांनी शेतकऱ्यांची एक बैठक घेतली असून आशिष मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी या बैठकीत केली आहे.

आज पहाटे साडे चार वाजता लखीमपूर या ठिकाणी शेतकरी नेते राकेश टिकेत पोहोचले असून त्यांनी शेतकऱ्यांची एक बैठक घेतली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी या बैठकीत केली आहे. जोपर्यंत या दोघांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृत शेतकऱ्यांचं अंतिम संस्कार केलं जाणार नाही असा इशारा राकेश टिकेत यांनी दिला आहे. दरम्यान या घटनेने देशभर संताप व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!