औरंगाबाद : खासदार इम्तिअज़ जलील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शहरातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी औरंगाबाद शहरातील उड्डाणपुलाबद्दल महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, औरंगाबाद विमानतळा समोर होणारे उड्डाणपूल आता होणार नाही. मात्र, शहरातील तीनही उड्डाणपूल जोडून शहरात अखंड उडण पूल होणार असे सांगितले. रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि जलील यांच्यात झालेल्या मुलाखातीत हे प्रस्ताव ठरला. अशी माहिती जलील यांनी दिली.
तसेच त्यांनी ‘क्रीडा विद्यापीठासाठी मी चंद्रकांत खैरेंचा कार्यकर्ता बनेल’ असे जलील म्हंटले. त्यांनी सांगितले कि, क्रीडा विद्यापीठ राज्यला फक्त एक मिळत असते. तसेच क्रीडा विद्यापीठासाठी आम्ही आंदोलन करतच राहू आणि आता पालकमंत्र्यांचा दौरा आहे. त्यांना काळे झेंडे दाखवत हे आंदोलन करू. तसेच क्रीडा विद्यापीठासाठी शिवसेने पुढाकार घ्यावा. तसेच चंद्रकांत खैरे यांनी देखील पुढाकार घ्यावा. त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या सोबत असेल असे देखील जलील म्हणाले.
शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या करोडी येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा खेलो इंडिया स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धडाकेबाज अर्धशतक करणारा जडेजा पोहोचला ‘या’ दिग्गजांच्या यादीत पाचव्या स्थानी
- तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड ७० धावांची पीछाडीवर, टीम इंडिया पहिला डाव सर्वबाद २७८
- पुनावाला यांची मोठी घोषणा ; कोवोवॅक्स भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार लाँच, तर लहान मुलांची…
- नाशिकरांनो सावधान ! एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

