🕒 1 min read
नवी दिल्ली: देशभरात ‘अग्निपथ’ योजनेवरून घमासान सुरु आहे. तरुणांनी या योजनेचा तीव्र निषेध करत ठिकठिकाणी आंदोलन छेडले आहे. देशात १३ राज्यांत याविरोधात आंदोलन केले जात आहे. बिहारमध्ये तर अनेक ठिकाणी ट्रेनही जाळण्यात आल्या. या योजनेबद्दल अनेक खोटी माहिती पसरवण्यात येत असल्याचे निदर्शनात आले आहे. यावरच केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठी कारवाई करत बिहारमधील ३५ व्हाॅट्सअप ग्रुपवर बंदी घातली आहे. तसेच १० जणांना खोट्या बातम्या पसरवत तरुणांची दिशाभूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
केंद्राकडून व्हाॅट्सअप तथ्य तपासणीसाठी ८७९९७११२५९ हा क्रमांक जारी करण्यात आला आहे. बिहारमधील वाढता विरोध पाहता १२ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहे. बिहारमध्ये बंदही पुकारण्यात आला होता.
दरम्यान अग्निपथ योजनेसंदर्भात तिन्ही सैन्य दलाकडून एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अग्निपथ योजना रद्द होणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत सैन्य भरती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र विरोधी पक्षाकडूनही या योजनेला आता तीव्र विरोध होताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भाजपचा पोकळ आत्मविश्वास, दूध का दूध – पाणी का पाणी होईल” भास्कर जाधवांची टीका
- वयाच्या १४ व्या वर्षी ओम पुरी यांनी ५५ वर्षांच्या मोलकरणीसोबत ठेवले होते शारीरिक संबंध
- Legislative council election : भाजपचे आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटलांचा मोठा दावा
- विधान परिषद निवडणुक संदर्भात भाजप आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया


