🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय महीला संघाची कर्णधार मिताली राजने आज महीला विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतारच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच तिने दिग्गज माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडूलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मिताली पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच ती सर्वात जास्त महीला विश्वचषक खेळणारी भारतीय खेळाडू बनली आहे.
तिने आतापर्यंत ६ महीला विश्वचषक खेळण्याचा विक्रम केला आहे. तिने आपल्या कारकिर्दीतील पहिला विश्वचषक २००० साली खेळला होता. त्यानंतर २००५, २००९, २०१३, २०१७ आणि आता २०२२ या विश्वचषकात भारतीय संघाचा ती भाग होती. तिने महिलांमध्ये न्यूझीलंडच्या डेबी हॉकले आणि शार्लोट एडवर्ड्स यांचा विक्रम तोडला आहे. तर भारताची जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी मिताली नंतर दुसऱ्या स्थानी आहे. तिने एकूण पाच महीला विश्वचषक खेळले आहेत.
मितालीने बरेचशे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. भारताकडून सर्वात जास्त धावा करणारी ती एकमेव महीला खेळाडू आहे. तिच्या नावावर दहा हजार पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय धावा आहेत. मिताली अगोदर सर्वात जास्त धावा न्यूझीलंडच्या शार्लोट एडवर्ड्स हिने केल्या होत्या. मितालीच्या नेतृत्वात भारतीय संघ दोन वेळा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गेला होता. परंतु दोन्ही वेळेस संघाला पराभव पत्करावा लागला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
