औरंंगाबाद : हर्सुल तलावाच्या पाण्याच्या सांडव्याजवळ असलेल्या खदानीत बुडून आसीफ कुरैशी (वय ३०,रा. हर्सुल परिसर) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली.
जटवाडा रोडवरील हर्सुल परिसरात राहणारा आसीफ कुरैशी हा मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हर्सुल तलावाच्या पाण्याच्या सांडव्याजवळील खदानीत पडला होता. खदानी असलेल्या पाण्यात आसीफ कुरैशी बुडाला असल्याचा प्रकार लक्षात आल्यावर काही युवकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली.
अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर.के.सुरे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी डी.डी.साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली डयुटी इंचार्ज मोहन मुंगसे, विनायक लिमकर, समीर शेख, शशीकांत गिते, अखय नागरे, अशोक पोटे,आमेर शेख,तन्वीर शेख, परमेश्वर साळुंके, शिवसंभा कल्याणकर, परेश दुधे, सुभाष दुधे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून पाण्यात बुडालेल्या आसीफ कुरैशी याचा मृतदेह सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास पाण्याबाहेर काढला. या घटनेची नोंद हर्सुल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

