🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते अनुपम खेर नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असतात. विविध मुद्यांबाबत ते सोशल मीडियाद्वारे देखील व्यक्त होत असतात. नुकतेच त्यांनी द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची लाइन प्रोड्यूसर सराहना यांच्याविषयी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. सराहनाने ३० जूनला तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. तिच्या मृत्यूची बातमी अभिनेते अनुपम खेर यांना कळली आणि त्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे त्यांनी एक पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
https://www.instagram.com/p/CRE10U5slUw/?utm_source=ig_web_copy_link
अनुपम यांनी पोस्टमध्ये लिहीले की, ‘ही सराहना आहे. मी डेहराडून व मसूरीमध्ये शूटींग करत असतानाचा तेव्हा ती कश्मीर फाइल्सची लाइन प्रोड्यूसर होती. गेल्यावर्षी २२ डिसेंबरला चित्रपटाच्या युनिटने सेटवर तिचा वाढदिवसही साजरा केला होता. लॉकडाऊनमुळे ती तिच्या अलीगड या गावी गेली होती. ती तिच्या कामात एकदम शानदार होती. माझ्या आईच्या वाढदिवसाला सराहनाने एक सुंदर मॅसेजही पाठवला होता. मी तिला फोन केला होता आणि आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या होत्या. पण आज सराहना या जगात नाही, असा मॅसेज मला मिळाला.
तर पुढे ते म्हणाले, मॅसेज वाचून मला जबर धक्का बसला. मॅसेज मिळताच मी सराहनाच्या आईला फोन केला आणि तिच्या मृत्यूची बातमी दुर्दैवाने खरी असल्याचे मला कळले. डिप्रेशनमुळे सराहनाने इतके टोकाचे पाऊल उचलले. डिप्रेशन आजच्या तरूणाईला संपू शकते. मी तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. तिची आई आणि भावाला या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो. खूप दु:खद. ओम शांती…’, अशी एक लांबलचक पोस्ट शेअर करत अनुपन खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अनुपम खेर यांची सिनेसृष्टीत एक उत्तम कलाकार म्हणून ओळख आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अनुपम खेर यांना न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्मसाठी त्यांना ‘बेस्ट अॅक्टर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अनुपम खेर आणि आहना कुमरा मुख्य भूमिकेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बीड, उस्मानाबादच्या हक्काच्या पाण्यासाठी आ.धस यांनी विधिमंडळात उठवला आवाज
- ‘अजित पवारांनी शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा’, आ.विनायक मेटेंची मागणी
- बुडाखाली अंधार! भाजप आ.लक्ष्मण पवार यांचा नगरसेवकच निघाला वाळूमाफिया
- मराठवाड्यात दमदार पाऊस; पिके बहरणार, मशागतीच्या कामांना वेग येणार
- एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी; वकिलांनी दिली महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
