🕒 1 min read
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद नांदेड, बीड, परभणी व हिंगोलीत गुरुवारी पाऊस झाला. या पावसाने पिकांना जीवदान मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील खैरगाव, चिखली फाटा, जलधरा येथील तीन पर्यायी पूल वाहून गेल्याने १५ तासांपासून वाहतूक ठप्प झाली होती.
औरंगाबादेत सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत बरसत होता. परभणी जिल्ह्यात जिल्ह्यात १३.१ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी पहाटे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सकाळी सहापर्यंत पावसाची भुरभुर सुरू होती. हिंगोली जिल्ह्यात मात्र बुधवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
मात्र, जिल्ह्यात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरापासून अवघ्या १२ किमी अंतरावर असणाऱ्या पाटोदा (ममदापूर) गावात गुरुवारी दुपारी ४ वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील मुख्य मार्गावरील नाल्या तुडुंब भरून वाहिल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले.
लातूर जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला. त्यामुळे कोमेजत असलेल्या पिकांसह चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे चेहरेही टवटवीत झाले. दरम्यान, आता मशागतीच्या कामांना या पावसामुळे गती येणार आहे. यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी लगबगीने उरकली होती. पेरणीनंतर १५ दिवस पावसाने उघडीप दिली. त्यामुळे कोवळी पिके सुकू लागली होती. मात्र, तीन दिवसांत नळेगाव, लिंबाळवाडी व देवंग्रा शिवारात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढा, नाल्यांचे पाणी शेतात घुसल्याने पीक व शेतातील माती वाहून गेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी; वकिलांनी दिली महत्वाची माहिती
- ‘कामाला लागा’; उद्धव ठाकरेंचे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना आदेश !
- एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी; वकिलांनी दिली महत्वाची माहिती
- अन् संजय राऊत म्हणाले ‘…तर निवडणुकीसाठी मी पुन्हा येईन!’
- रोजगाराची मोठी संधी : राज्यातील सुमारे ६ हजारहून अधिक शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
