🕒 1 min read
मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर ईडीने खडसेंना समन्स बजावत आज चौकशीसाठी बोलावलं. आज ते ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते.
एकनाथ खडसे यांची ईडीने तब्बल ९ तास कसून चौकशी केली आहे. चौकशीला जाण्याआधी खडसेंनी भाजपवर हल्लाबोल केला होता. तर, चौकशीनंतर त्यांनी माध्यमांसोबत बोलण्यास नकार दिला. मात्र, त्यांच्या वकिलांनी चौकशीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
‘खडसे यांनी चौकशीत सहकार्य केलं. यावेळी अनेक स्टेटमेंट तपासण्यात आले. ईडीला हवे असलेले कागदपत्र आम्ही दिले आहेत. अजून काही लागणारी कागदपत्रे 10 दिवसांत देणार आहोत. तसंच गरज भासेल तेव्हा चौकशीला उपस्थित राहणार असं आश्वासन खडसे यांनी दिलं आहे. ईडीने पैशांच्या व्यवहाराबाबत, तसंच भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी केली. खडसे यांनी सविस्तर माहिती दिली आहे,’ अशी माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कामाला लागा’; उद्धव ठाकरेंचे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना आदेश !
- ओबीसी आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक पुढे ढकला; नितीन राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- अन् संजय राऊत म्हणाले ‘…तर निवडणुकीसाठी मी पुन्हा येईन!’
- रोजगाराची मोठी संधी : राज्यातील सुमारे ६ हजारहून अधिक शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल
- ‘ओ माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राची चिंता करा; युती-आघाड्यांची चिंता करू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
