🕒 1 min read
बीड : मुंबईत झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी सन २०१९ पासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात जे स्मारक उभारण्यात येणार होते, या स्मारकाला सन २०१९ मध्ये न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन हा विषय मार्गी लावावा, तसेच या विषयी येणाऱ्या काही दिवसात बैठक बोलवावी अशी मागणी आ. विनायक मेटे यांच्याकडून करण्यात आली आहे. त्याबरोबरच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत मराठा समाजातील मुला-मुलींना मिळणाऱ्या सुविधेपासून वंचित ठेवू नये. यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात यावे. अशी मागणी देखील यावेळी आ. मेटें यांच्याकडून करण्यात आली आहे.
२६ जुलैपासून राज्यभर आंदोलन
शंभर वर्षांपूर्वी राजश्री शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले पण एवढ्या वर्षानंतर ही सध्याच्या सरकारला ते देता येत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी येत्या २६ जुलैपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होईल अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिली होती.
सुकाणू समितीद्वारे शिवप्रेमींच्या डोळ्यात धूळफेक
राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तयार केलेली सुकाणू समिती ही शिवप्रेमींच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी केली आहे. या समितीमध्ये कोणीही इतिहास तज्ज्ञ, दुर्गप्रेमी यांचा समावेश नाही. केवळ निमंत्रित सदस्य म्हणून छत्रपती संभाजी राजे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे, असा आरोप मेटे यांनी राज्य सरकारवर केला होता.
महत्वाच्या बातम्या
- बुडाखाली अंधार! भाजप आ.लक्ष्मण पवार यांचा नगरसेवकच निघाला वाळूमाफिया
- मराठवाड्यात दमदार पाऊस; पिके बहरणार, मशागतीच्या कामांना वेग येणार
- एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी; वकिलांनी दिली महत्वाची माहिती
- ‘कामाला लागा’; उद्धव ठाकरेंचे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना आदेश !
- एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी; वकिलांनी दिली महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
