औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनात कुचराई करणाऱ्या रेड्डी कंपनीला आता महानगरपालिकेने नियमांचा हवाला देत घेरले आहे. रस्त्यावर पडलेला कचरा न उचलल्यास रेड्डी कंपनीला पहिल्या दिवशी हजार तर दुसऱ्या दिवशी दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच घंटागाडी वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोज नसल्यास स्वच्छता निरीक्षकां मार्फत कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
शहरात घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी बंगळूरच्या रेड्डी कंपनीचे महापालिकेने नेमणूक केलेली आहे. दोन वर्षांपासून रेड्डीद्वारे कचरा गोळा करून त्याची प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक केली जाते. यासाठी या कंपनीला प्रतिक्विंटल १८६३ रुपये मोबदला दिला जातो. तरीही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा आढळून येत आहे. जेव्हापासून कंपनीची नियुक्ती झाली आहे तेव्हापासून आजपर्यंत पूर्णपणे समस्या सुटली असे झालेले नाही. त्यामुळे आता घनकचरा संकलन व वाहतुकीच्या कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पालिकेने शक्कल लढवली आहे. त्यानुसार सर्व स्वच्छता निरीक्षकांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
त्यानुसार यापुढे कचरा संकलन पॉईंट तसेच शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा सकाळी अकरा वाजेपर्यंत उचलला नाही तर पहिल्या दिवशी एक हजार तर दुसऱ्या दिवशी तब्बल दोन हजार रुपयांचा दंड करून त्याचा अहवाल वॉर्ड अधिकार्यांकडे सादर करावा अशा सूचना सर्व स्वच्छता निरीक्षकांना करण्यात आल्या आहेत. तसेच वॉर्डामध्ये कचऱ्याची गाडी उशिरा येत असल्यास भोंगे बंद असल्यास प्रति गाडी पाचशे रुपये प्रमाणे दंड ठोठावला जाणार आहे. याप्रमाणेच या काळात जीव धोक्यात घालून दुर्गंधीचे काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य, ग्लोव्हज, मास्क नसल्यास कंपनीला शंभर ते एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पेगासस प्रकरण : ‘अधिवेशनाच्या आदल्या दिवशी असे अहवाल प्रकाशित होणे हा योगायोग नाही’
- ८२ एक्सप्रेस, पॅसेंजरसहीत नांदेड रोटेगाव डेमू रुळावर, प्रवाशांकडून स्वागत!
- ‘ठाकरे सरकारमध्ये नेते कमी अन् बोलके पोपटच जास्त’, ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा टोला
- ‘वाकला – चांदेश्वर जलप्रकल्प जलसंपदा विभागाला पुर्ण करण्याचे आदेश जारी’
- चित्रा वाघ यांनी केले संजय राऊतांचे कौतुक, म्हणाल्या… त्यासाठी केंद्राला जबाबदार धरले नाही!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

