🕒 1 min read
IND vs AUS | मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये झालेल्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना भारतीय महिला संघाने सुपर ओव्हर (Super Over) मध्ये जिंकला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत 187 धावा केल्या होत्या. तर भारतीय संघानेही फलंदाजी करताना 187 धावा करून ऑस्ट्रेलियाला बरोबरीची टक्कर दिली. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने 20 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियन संघ फक्त 16 धावा काढू शकला. हा सामना जिंकून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते. हा सामना जिंकून भारतीय महिला संघाने या फक्त मालिकेमध्ये आपले स्थान उंचावले नाही, तर भारतीय महिला क्रिकेटसाठी हा सामना खास सामना होता. येणाऱ्या काळामध्ये भारतीय महिला क्रिकेटचे चित्र बदलणार असून त्याची झलक भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंनी या सामन्यात दिली आहे.
मुंबई येथील डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यादरम्यान स्टेडियम खचाखच प्रेक्षकांनी भरलेले होते. महिला क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, हे या सामन्यादरम्यान दिसले आहे. महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाचा दबदबा राहिला आहे. अशा परिस्थितीत या सामन्यामध्ये सुपर ओवरमध्ये भारतासाठी ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे कठीण आहे, असे वाटत होते. मात्र, भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे.
ऑस्ट्रेलियन संघातील रिया घोषने सुपर ओवरमध्ये पहिल्याच चेंडू षटकार मारला होता. दरम्यान, भारतीय संघ हा सामना हरू शकतो असे वाटत होते. मात्र भारतीय संघातील स्मृती मंधानाने तीन चेंडूमध्ये 13 धावा करत सुपर ओव्हर एकतर्फी करून टाकली होती. या सुपर ओवरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने 20 धावा काढल्या. भारतीय संघातील गोलंदाज रेणुकाने सुपर ओव्हरमध्ये पहिल्या चार चेंडूमध्ये ऑस्ट्रेलियाला फक्त 6 धावा काढू दिल्या.
हा सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ हातात तिरंगा घेऊन मैदानावर फेरफटका मारताना दिसला आहे. भारतातील क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षण होता. या सामन्यानंतर भारतामध्ये महिला क्रिकेट संघाची लोकप्रियता नक्कीच वाढणार आहे. अलीकडेच बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंचे शुल्क पुरुष क्रिकेट खेळाडूंच्या बरोबरीने वाढवले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ पुरुष संघापेक्षा कमी नाही, हे कालच्या सामन्यानंतर सिद्ध झाले आहे.
IND vs AUS | भारतीय महिला क्रिकेट मधील अविस्मरणीय क्षण, व्हायरल झाली विक्ट्री क्लीपhttps://t.co/wJGJ3oQlaM
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 12, 2022
महत्वाच्या बातम्या
- Shahrukh Khan | ‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी किंग खान पोहोचला माता वैष्णोदेवीच्या दारात
- World Test Championship | ICC ने ‘या’ चॅनलला दिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप प्रसारणाची जबाबदारी
- Rajinikanth | बस कंडक्टर ते थालाइवा कसा होता रजनीकांतचा प्रवास?, जाणून घ्या
- Supriya Sule | चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” गृहमंत्र्यांचा कायदा…”
- Asim Sarode | “शाईफेक प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा खटला मोफत चालवणार”; असीम सरोदे यांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
