🕒 1 min read
Rajinikanth | टीम महाराष्ट्र देशा: सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आज आपला 72 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. मूळचे मराठी कुटुंबातील असलेले रजनीकांत बेंगलोर येथे राहायचे. १२ डिसेंबर 1950 रोजी जन्मलेल्या रजनीकांत यांची खरे नाव शिवाजी राव गायकवाड (Shiwaji Rao Gaikwad)असे आहे. त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेले आहे. रजनीकांत यांचे शिक्षण बेंगलोर येथेच पूर्ण झालेले आहे. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती हलकीच्या असल्यामुळे त्यांनी तरुण वयातच कंडक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली होती. कंडक्टर म्हणून काम करत असताना बसमध्ये त्यांची अनोखी तिकीट कापण्याची पद्धत फार लोकप्रिय झाली होती.
रजनीकांत (Rajinikanth) यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास
सुपरस्टार रजनीकांत यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा बस चालक मित्र राम बहादुर यांनी त्यांना खूप मदत केली होती. राम बहादूर यांनीच रजनीकांतला मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रेरित केले होते. पुढे त्यांनी अभिनय शिकताना तमिळ भाषा देखील शिकली. दरम्यान, त्यांना चित्रपट दिग्दर्शक के. के. बालचंद्र यांच्या ‘अपूर्व रंगागल’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटांमध्ये रजनीकांतसोबत कमल हसन आणि श्रीविद्या हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटामध्ये रजनीकांत यांची छोटीशी नकारात्मक भूमिका होती. चित्रपटसृष्टीमध्ये सुरुवातीच्या काळात रजनीकांत यांनी दोन-तीन वर्ष अशाच छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर त्यांना ‘भुवन ओरू केल्विकुरी’ या चित्रपटांमध्ये सकारात्मक भूमिका करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटांमधील रजनीकांत आणि मुथुरमन यांची जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती. त्यामुळे त्यानंतर या दोघांनी जवळपास 25 चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे.
1978 मध्ये रजनीकांत यांचा ‘बिल्ला’ हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट दिग्गज अभिनेते अभिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ चित्रपटाचा रिमेक होता. रजनीकांत यांच्या या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर ते 1995 मध्ये रिलीज झालेल्या ‘बाशा’ चित्रपटाच्या माध्यमातून सुपरस्टार बनले होते. रजनीकांत यांच्या ‘शिवाजी:द बॉस’ या हिंदी चित्रपटाने अनेक विक्रम मोडलेले आहे. हा चित्रपट दक्षिण आफ्रिका आणि युकेमध्ये देखील प्रदर्शित झाला होता.
सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. त्यांनी दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. रजनीकांत यांनी तमिळ आणि हिंदीसह मल्याळम, कन्नड, तेलुगु, बंगाली इत्यादी भाषांमध्ये देखील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘अंधा कानून’ या चित्रपटाच्या माध्यमातून रजनीकांत यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले होते.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” गृहमंत्र्यांचा कायदा…”
- Asim Sarode | “शाईफेक प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा खटला मोफत चालवणार”; असीम सरोदे यांची घोषणा
- Raju Shetti | शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेंवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; राजू शेट्टी म्हणाले, “तालिबान्यांसारखे…”
- Manoj Garbade | मनोज गरबडे वरील कारवाई बेकादेशीर?; सोशल मीडियावर ‘Release Manoj Garbade’ ट्रेण्डवर
- Uddhav Thackeray | “कर्नाटकचे मुख्यमंत्री मस्तीत बोलतात आणि आपले मुख्यमंत्री…”; सीमाप्रश्नावरून ठाकरेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

