Share

Breaking News : मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रविण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे.

आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला असून मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा विधानसभेत केला होता. त्यानंतर आज दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रविण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे दरेकरांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!