🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. या परिस्थितीत सर्वांचे लक्ष शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडे लागले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राऊतांवर खोचक टीका केली आहे.
यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘गेले ४ दिवस शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची भाषा बदलली आहे. कारण मी समजू शकतो. तसेच डर्टी डझन वर कारवाई होणारच’, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.
ShivSena Spokesperson Sanjay Raut's language has changed in last 4 days
"Reason I can understand"
But Our Crusade against Dirty Dozen will not STOP !!
गेले ४ दिवस शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची भाषा बदलली आहे
"कारण मी समजू शकतो"
डर्टी डझन वर कारवाई होणार च…@BJP4India
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 14, 2022
दरम्यान, काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या १२ नेत्यांची यादी ट्विटच्या माध्यमातून जाहीर केली होती. ज्यामध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद आडसुळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड आदींचा समावेश आहे. तसेच मविआचे १२ नेते कारवाईच्या रांगेत आहेत, असेही सोमय्या म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
-
“हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा”, नाना पटोलेंचे टीकास्त्र
-
“त्याला जसे वाटेल तो तसा खेळेल” कर्णधार रोहितने दाखवला ‘या’ स्टार खेळाडूला पाठींबा
-
Hijab case : कर्नाटक हायकोर्टात आज होणार फैसला; अनेक जिल्ह्यांत कलम १४४
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
