🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांच्या राजीनाम्याची मागणी अजूनही भाजपने कायम ठेवली आहे. भाजपकडून विधानभवनच्या पायऱ्यांवर सतत राजीनामा मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मात्र अजूनही मविआ सरकारने त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये. यावरच आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे.
“संजय राठोड, अनिल देशमुख, सरकारी वकील प्रकाश चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागतो. महाविकास आघाडीत नवाब मात्र सरंक्षला जातो. हा महा चमत्कार असतो.”, असा खोचक टोला केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत लगावला आहे.
संजय राठोड,
अनिल देशमुख,
सरकारी वकील प्रकाश चव्हाण
यांना राजीनामा द्यावा लागतो.
महाविकास आघाडीत नवाब मात्र सरंक्षला जातो. हा महा चमत्कार असतो.— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 15, 2022
दरम्यान या अगोदर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांकडून आझाद मैदानावर भव्य मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र अजूनही ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाहीये. ठाकरे सरकार दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Hijab case : कर्नाटक हायकोर्टात आज होणार फैसला; अनेक जिल्ह्यांत कलम १४४
- “त्याला जसे वाटेल तो तसा खेळेल” कर्णधार रोहितने दाखवला ‘या’ स्टार खेळाडूला पाठींबा
- “हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा”, नाना पटोलेंचे टीकास्त्र
- भाजपने काश्मीरी पंडितांसाठी काय केलं?; हिंदू महासंघाचा सवाल
- IND vs SL : मालिकेत पराभव मात्र या श्रीलंकन खेळाडूचे भारतीय क्रिकेटरसिकांकडून ‘या’ कारणास्तव होतोय कौतुक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
