Share

शेतकरी आंदोलनामागे राजकीय पक्षांचा हात- नवनीत राणा

Published On: 

मुंबई : देशात सद्या वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

शेतकऱ्यांच्या भारत बंदला मिळालेला पाठींबा पाहता सरकारने नमतं घेत एक दिवसा आधीच म्हणजेच 8 डिसेंबरलाच घेतली. मात्र ही बैठक सुद्धा निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. नव्या कृषी कायद्यांवर आता चर्चा नको तर हे काळे कायदे थेट रद्द करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनावर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यातच काही राजकीय नेते आणि राजकीय पक्ष शेतकऱ्यांना समोर करून, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला निशणा साधत आहेत,असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलाय. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

जर कृषी कायद्यांवर बोलायचं झाल्यास, महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये शेतकरी या कायद्याचं चांगलं स्वागत करतोय. जर महाराष्ट्रातील शेतकरी शांत बसलेत, तर त्यांना हा कायदा आवडतोय. शेतकऱ्यांना या कायद्यातून स्वातंत्र्य दिलं,असं म्हणत नवनीनत राणा यांनी नव्या कृषी कायद्याचं समर्थन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!