🕒 1 min read
बेंगळूरू: युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड, ही एक भारतीय अल्कोहोलिक पेय पदार्थ निर्मिती कंपनी आहे, हि जगातील खंडातील आणि जगातील दुसर्या क्रमांकाची स्पिरिट कंपनी आहे. ही डायजेओची सहाय्यक कंपनी असू तिचे मुख्यालय कर्नाटकच्या बेंगळूरूमधील यूबी टॉवर येथे आहे. यूएसएल ३७ पेक्षा जात देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते.
कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार मार्च २०१९ पर्यंत यूएसएलकडे १० लाखांहून अधिक मद्य ब्रँड आहेत, त्यापैकी १ ब्रँड प्रत्येक वर्षी दहा लाखाहून अधिक केसेसची विक्री करतात तर ब्रॅण्ड्स प्रत्येक वर्षी १० दशलक्षाहून अधिक केसेसची विक्री करतात.
भारतातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पराथामच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी कंपनीनं याबाबत माहिती दिली. आनंद कृपालू हे २०१४ या कंपनीत रूजू झाले होते. ते युनाटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी ३० जून २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. हिना नागराजन या १ जुलै २०२१ पासून कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रं स्वीकारतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.
हिना नागराजन यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आनंद कृपालू हे या पदावर कार्यरत आहेत. आता आनंद कृपालू यांची जागा या हिना नागराजन या घेणार आहेत. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
“आनंद कृपालू यांनी आपल्या कार्यकाळात कंपनीमध्ये बदल घडवले आणि त्यांच्या कार्यकाळात कंपनीची मोठी प्रगतीही झाली. या दरम्यान कंपनीला मोठा फायदाही झाला,” असं कंपनीकडून सांगण्यात आलं. हिना नागराजन या सध्या USL ची मूळ कंपनी जियाजिओ मध्ये आफ्रिकन बाजार विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे. डियाजिओमध्ये पद सांभाळण्यापूर्वी त्यांनी नेस्ले इंडिया, मॅरी के या कंपन्यांमध्येही व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळली आहे. २०१८ मध्ये त्या डियाजिओमध्ये रूजू झाल्या होत्या. या ठिकाणी त्यांनी आपएमचं नेतृत्व केलं.
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय? २४ तासांत होणार कोरोनाचा नाश!, प्रभावी औषध शोधण्यास शास्त्रज्ञांना यश
- दानवे यांनी घेतलेली भूमिका हीच केंद्र सरकारची भूमिका आहे ? विरोधकांनी भाजपला घेरलं
- आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार!; ‘त्या’ रानगव्याला पुणेकरांची अनोखी श्रद्धांजली
- ‘मराठवाडयात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईचे 25% सुध्दा पैसे मिळाले नाहीत’
- धडक कारवाईत २७० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; आतापर्यंत शहरातून एक कोटी दंड वसूल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

