Share

गुड न्यूज : चक्क अहमदनगरमध्ये श्वानाचे बेबी शॉवर

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : अनेकदा आपण पहिले कि पाळीव प्राण्यांचे जन्मदिवस दिवस साजरी केले जातात मात्र, नगरमध्ये चक्क एका पाळीव श्वानाचे डोहाळजेवण करण्यात आले. ‘ल्युसी’ असे या श्वानाचे नाव असून ती ‘गुड न्यूज’ देणार असल्याचे कळताच तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम झाला व त्याची चांगलीच चर्चा रंगली.

नगरच्या सावेडी उपनगरातील रहिवासी भगवान व प्रभावती कुलकर्णी कुटुंबियांनी त्यांच्याकडे असणाऱ्या लहासा अॅप्सो जातीच्या ‘ल्युसी’ या श्वानाचे डोहाळजेवण केले. ल्युसी ‘गुड न्यूज’ देणार असल्याचे कळताच तिचे साग्रसंगीत डोहाळजेवण साजरे करण्याचा निर्णय घेत कुलकर्ण्यांनी जोरदार तयारी केली.

एका टीव्ही वाहिनीवरील डान्स स्पर्धेतील विजेता व अभिनेता राहुल कुलकर्णी व शैला कुलकर्णी यांनी या अनोख्या सोहळ्याचे आयोजन केले. डोहाळजेवण कार्यक्रमासाठी सजवलेला झोका व धनुष्यबाण, परिसरात फुलांची सजावट, लाऊडस्पिकरवर पारंपारिक गाणी लावण्यात आली. एवढंच नव्हे तर, गर्भवती महिलेला डोहाळजेवणाला ज्याप्रमाणे हिरवी साडी-चोळी घेतली जाते, त्याचप्रमाणे ल्युसिलाही खास शिवलेला हिरवा ड्रेस घालून व हेअरस्टाईल करून नटवण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!