Share

‘सत्ताधारी फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करतात म्हणूनच आज त्यांची हल्ला करण्याची हिंमत होत आहे’

Published On: 

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.विशेष म्हणजे या हल्ल्यात कल्पिता पिंगळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे.

अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या नराधम फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पिंपळे या माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. ठाणे महापालिकेच्या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून पिंपळे यांच्यावर चाकूने अचानक हल्ला करण्यात आला. बचावासाठी त्यांनी हात वर केल्यावर त्यांची दोन बोटेच तुटून पडली. पिंगळे यांच्या बचावासाठी धावलेल्या अंगरक्षाचेही एक बोट तुटले आहे.

या घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, याच माथेफिरूने पूर्वीसुद्धा एक दीड वर्षापूर्वी अशाच पद्धतीने हल्ला केला होता परंतु त्याला पुन्हा तिथे बसण्याची मुभा कोणी दिली ?  ठाणे येथे महानगरपालिकेत जे सत्ताधारी आहेत ते फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करतात म्हणूनच आज पुन्हा अशा माथेफिरूंची हल्ला करण्याची हिंमत होत आहे. प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने आम्ही याचा निषेध करत आहोत आणि अशा महिला अधिकाऱ्यांना सुरक्षिततेचा विचार महानगरपालिकेने करावा अशी मागणी करत आहोत असे खापरे यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!