Share

‘लोकांचा जीव वाचवणे पाप असेल तर मविआ सरकार हे पाप करत आहे, ‘ काँग्रेसच्या सीमा थोरातांचा भाजपवर पलटवार!

Published On: 

औरंगाबाद : श्रावणासारख्या पवित्र महिन्यात मंदिर बंद ठेवण्यापेक्षा मोठे पाप नाही. तेच पाप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीका भाजपच्या महिला आघाडीने केली आहे. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसच्या महिला आघाडीने लोकांचा जीव वाचवणे हे जर पाप असेल तर महाविकास आघाडी सरकार हे पाप करत आहे. देव हा मनात असावा लागतो त्यासाठी मंदिरात वेगळे जाण्याची गरज नाही. अशाप्रकारचे जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे भाजपने राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. श्रावण महिन्यात देव बंदिस्त ठेवणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध करत, भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा अॅड. माधुरी अदवंत यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा थोरात म्हणाल्या, कर्नाटक मध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. दिड लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

यात पाप पुण्याचा विषयच कुठून येतो. आपण आज वाचलो तर पुढे सगळे काही करु शकू. भाजपची ही मागणी मुळातच चुकीची आहे. देव हा मनात असावा लागतो. तरच तो पावतो. त्यासाठी मंदीरात जाऊन पाप पुण्याचा हिशोब मांडण्याची गरज नाही. असा टोला त्यांनी भाजपच्या महिला आघाडीला लगावला आहे. तर भाजपने मंदिरे खुली झाली तर मंदिर व्यवस्थापन समितीचं कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करेल. मात्र, ठाकरे सरकारचा हिंदू द्वेष्टेपणा यातून दिसून येत आहे. त्यामुळे हिंदूत्त्वाचा बेगडीपणा दाखवणे सरकारने बंद करावे. असेही यात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!