Share

भाजप शिवरायांच्या विचाराने काम करतेय, लोकांच्या हितासाठी भाजप प्रवेश करतोय – उदयनराजे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: शिवरायांच्या विचाराने भाजप काम करत आहे. जनतेचे हित पुढे ठेवून निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यात राजीनामा दिला आहे, यापुढे देखील समाजासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हंटले आहे. उदयनराजे यांनी आज नवी दिल्ली येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर आज उदयनराजे यांचा भाजप प्रवेश झाला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे त्यांचा प्रवेश झाला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे गुणगान गायले आहे.

मी लहान असल्यापासून काश्मीरचा प्रश्न ऐकत आलेलो आहे, कोणत्याही राज्यकर्त्यांनी तो निकाली काढण्यासाठी काम केले नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न मार्गी लावला. भाजप शिवरायांच्या विचाराने काम करत असल्यानेच त्यांची प्रत्येक राज्यात प्रगती होत आहे. लोकशाहीला खऱ्या अर्थाने मजबूत करण्याचे काम मोदी व शहा यांनी केल्याचं उदयनराजे म्हणाले आहेत.

भाजप प्रवेशापूर्वी उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला आहे. भाजप प्रवेशापूर्वी उदयनराजे यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून एक फेसबुक पोस्ट केली होती. तुमच्यासाठी काल ही होतो, आजही आहे आणि शेवटच्या श्वासा पर्यंत असेन, असे भावनिक उद्गार उदयनराजे यांनी काढले आहेत.

उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. भाजप प्रवेशापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्याशी देखील चर्चा केली होती, परंतु त्यांचे मन वळवण्यात पवार यांना अपयश आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील उदयनराजे यांच्याशी संपर्क साधला होता, परंतु ‘मी जात आहे, आता संपर्क करू नका’, असा मेसेज त्यांनी दिला होता.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!