Share

Udhhav Thackeray । “रावणाने ज्या पद्धतीने सीतेचे अपहरण केले त्याच…”; ठाकरेंचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

Udhhav Thackeray । मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट असा वाद राज्यात निर्माण झाला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच वेदान्त फॉक्सकॉन’नंतर टाटा-एअर बस प्रकल्प गुजरातला गेला आहे. राज्यात होणारे प्रकल्प बाहेर गेल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यावरून शिवसेनेने केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर ‘सामना’तून (Samana) हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे प्रकल्प ओरबाडून नेले जात आहेत आणि मिंधे-फडणवीस सरकार भरसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू असताना सभेतील प्रमुख लोक जसे माना खाली घालून बसले होते तसे बसले आहे. रावणाने ज्या पद्धतीने सीतेचे अपहरण केले त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील उद्योग-रोजगार संधींचे अपहरण गुजरातेत केले जात असल्याचं सामनात म्हंटल आहे.

पुढे म्हटलंय कि, हे अपहरण उघड्या डोळ्याने पाहणारे मुख्यमंत्री त्यांच्या मिंधे गटासह रामदर्शनासाठी म्हणे अयोध्या नगरीत निघाले आहेत, हा विनोदच म्हणावा लागेल. महाराष्ट्राला कंगाल बनविण्यासाठी व राज्याचा स्वाभिमान, अस्मिता खतम करण्यासाठीच महाराष्ट्रात मिंधे सरकार स्थापन झाले हे आता नक्की झाले, अशा शब्दात ठाकरे गटाने भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून चार मोठे औद्योगिक प्रकल्प गुजरातेत गेले. हे प्रकल्प कर्नाटकात, आंध्रात, उत्तर प्रदेशात, बिहारात गेले नाहीत. ते मागास छत्तीसगड किंवा झारखंड राज्यात गेले नाहीत. ते प्रकल्प ठरवून मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत, व त्या ‘किडनॅपिंग’वर राज्याचे मिंधे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला भाजप आणि शिंदे गटाकडून काय उत्तर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!