मुंबई : “शिंदे गटाला काही तरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे त्यांचे अचानक नावडते झाले”, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील हे आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. “शिंदे गटात जाण्याची प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. कुणाला कशाची भीती वाटत आहे, हे लोकांना माहिती आहे. तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर लोक शिंदे गटाबाबत काय चर्चा करत आहेत याची कल्पना येईल”, असेही जयंत पाटील म्हणाले.
“खऱ्या शिवसैनिकांनी कधीच निष्ठा बदलली नाही. सर्व शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. काही लोक इकडे-तिकडे गेलेत. मात्र खरा शिवसैनिक अजूनही तळ ठोकून आहे”, असेही पाटील यावेळी म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची सध्या ईडी कडून चौकशी सुरु आहे, या संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, “सोनिया गांधी यांच्या चौकशीवेळी मानवतावादी दृष्टीकोन ठेवायला हवा. सध्या ईडी, सीबीआय, आयटी या संस्थांमार्फत चौकशी होणे ही नेहमीचीच गोष्ट झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांचे वय आणि प्रकृती पाहता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी करायला हवी होती. राजकारण होत राहील मात्र मानवतावादी दृष्टिकोन ठेवायला पाहिजे.”
दरम्यान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चौकशीवरून देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील नेते मंडळीही त्याविरोधात आंदोलने करताना पाहायला मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Narayan Rane : “आदित्य ठाकरेंना शेंबूड पुसता येतो का?, कुणाला काहीही गद्दार म्हणता”; नारायण राणेंची सडकून टीका
- Ashish Shelar | उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच – आशिष शेलार
- Shahjibapu Patil : उद्धव ठाकरे आजारी होते तर एकनाथ शिंदेंना चार्ज द्यायचा होता – शहाजीबापू पाटील
- Virat Kohli : विराट कोहलीकडे अजूनही ३० ते ३५ शतकं ठोकण्याची क्षमता – रॉबिन उथप्पा
- Baba Ramdev | रामदेव बाबांनी सुरु केली कावड सेवा; नेटकरी करतायेत ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

