Share

महिला सरपंचांच्या पतीने घेतली २० हजारांची लाच; एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहाथ

Published On: 

जालना: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रकमेचा दुसऱ्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी महिला सरपंचांच्या पतीने लाभार्थ्यांना ३० हजारांची मागणी केली. या रक्कमेत तडजोड होवून २० हजारांची लाच घेतांना महिला सरपंचांचे पती तथा ग्रा.पं. सदस्य रंगनाथ सुभाष देवकाते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. गुरूवारी काजळा ग्रामपंचायत कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.

या मंजूर रक्कमेच्या पहिला हप्त्याची १५ हजार रूपयांची रक्कमही खात्यावर जमा झाली. आता दुसऱ्या हप्त्याची ४५ हजार रूपयांची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायत कार्यालय गाठले असता काजळा येथील महिला सरपंचाचे पती तथा ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ सुभाष देवकाते याने दुसरा हप्ता जमा करण्यासाठी ३० हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या विभागाच्या पथकाने लाचेच्या मागणीची खातरजमा करून गुरूवारी काजळा ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारदाराकडून २० हजार रूपयांची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, काजळा ग्रामपंचायत अंतर्गत तक्रारदारास पंतप्रधान आवास योजनेचे १ लाख २० हजार रूपयांची रक्कम मंजूर झाली. तरी सदरील संरपच महिलेचा पती तथा ग्रा.पं. सदस्य रंगनाथ सुभाष देवकाते यांनी पैशाची मागणी केली. सदरचा सापळ्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, उपाधीक्षक रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एम. शेख, पोलिस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गजानन कांबळे, ज्ञानेश्वर म्हस्के, शिवाजी जमधडे यांनी पार पाडली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!