मुंबई : देशभरात करोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून याबाबत महाराष्ट्र सर्वात पुढं आहे.देशातील काही राज्यांमध्ये नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे.राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. त्यातच मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होत असल्याचे दिसत आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत काल मोठी वाढ झाली आहे. केंद्राने महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 31 मार्च पर्यंतच्या कालावधीसाठी महाराष्ट्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि हानी टाळणे हे सध्या सरकारच्या समोरील आव्हान असल्याचे दिसून येत आहे. राज्यात दिवसेंदिवस बिकट परिस्थिती बनत असताना आता लसीकरण हाच सध्याच्या घडीला कोरोनाला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे असे जाणकार सांगू लागले आहेत.
एकीकडे हे सर्व सुरु असताना दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्राला पुढच्या काही दिवसात कोरोना लसींचा तुटवडा जाणवू शकतो असे देखील चित्र आहे . त्यामुळे हाफिकनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मिती शक्य आहे का? याची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परळ येथील प्रसिद्ध हाफकिन इन्स्टिट्यूट संस्थे हाफकिनमध्ये आले होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हाफकीन संस्थेस भेट व पाहणी तसेच अधिकाऱ्यांसमवेत बैठक.
CM Uddhav Balasaheb Thackeray at the Haffkine Institute. Meeting with the officials is underway. pic.twitter.com/5LhohiMtO9
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 20, 2021
दरम्यान, ICMR मार्गदर्शनाखाली भारत बायोटेक जी कोरोना लस बनवत आहे. तिचं उत्पादन महाराष्ट्रात करु इच्छितो, तर त्याला परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. यावर पंतप्रधान मोदींनी याबाबतचा प्रस्ताव द्या त्याला मंजूरी देतो, असे सांगितले होते.
त्यानुसार येत्या काही दिवसात हा प्रस्ताव पाठवला जाईल. या प्रस्तावावर सकारात्मक परवानगी मिळाली तर येत्या काही महिन्यात ही लस बनवली जाणार आहे. हाफकीन माध्यमातून, महाराष्ट्र सरकार लस निर्मिती करेल,” असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. दरम्यान,या पाहणीनंतर उद्धव ठाकरेंनी इन्सिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी दीर्घ चर्चा देखील केली त्यामुळे आगामी काळात कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मिती या ठिकाणी होणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक – उद्धव ठाकरे
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- चाहत्यांना आश्चर्याचा धक्का रश्मिका चालावतीय शेतात नांगर पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

