मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची घडामोडी घडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या उपाध्यक्षांनी शिवसेना मध्ये प्रवेश केलाआहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजप तसेच शिंदे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. अशातच भाजपच्या उपाध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी देणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.
भाजप उपाध्यक्ष ज्योत्स्ना दिघे यांनी शिवसेना मध्ये केला प्रवेश:
मुंबई जिल्हा भाजपच्या उपाध्यक्ष ज्योत्स्ना दिघे यांनी शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे. दिघे यांच्यासह अनेक कार्यकर्ते समर्थकांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते अनिल परब हे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केलंः
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली होती. याला प्रत्युत्तर देत अनेक भाजप नेते तसेच शिंदे गटातील नेते आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Narendra Modi | धक्कादायक! पिएफआयच्या निशाण्यावर होते नरेंद्र मोदी, कटासाठी ‘इतके’ कोटी पैसा जमा
- Upcoming Bike | Royal Enfield ची Bullet 350 लवकरच होऊ शकते नवीन स्टाईलमध्ये लॉंच, किंमत देखील असेल खास
- Recruitment of Teachers | ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती राज्यात केली जाणार – दिपक केसरकर
- Devendra Fadanvis | “महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही” ; देवेंद्र फडणवीस संतापले
- “गद्दारांच्या घोषणा खपवून घेणार नाही” ; पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर सिद्धार्थ शिरोळे आक्रमक|


