Share

Devendra Fadanvis | “महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही” ; देवेंद्र फडणवीस संतापले

Published On: 

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणे एनआयए आणि ईडी यांनी अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं याप्रकरणी 60 ते 70 जाणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस संतापलेः

महाराष्ट्रात, भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नसल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे. तसेच त्यांच्याकडे कारवाई करू, घोषणा देणारे जिकडे असतील तिकडे जाऊन त्यांना शोधून काढून असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांनी अटक केल्याच्या निषेधार्थ घोषणा देत पूर्ण रस्ता अडवला होता. यावेळी त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर, असे नारे दिले होते. त्यांच्या या घोषणाबाजी मुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ विरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

पिएफआय यांचा कटः

पिएफआय कडून देशात अशांतता निर्माण करण्याचा षड्यंत्र रचण्यात येत होतं, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, एनआयए आणि ईडीने केलेल्या कारवाईला काही ठिकाणी विरोध होत आहे. पीएफआयवर करण्यात आलेल्या कारवाई मागे अनेक खास गोष्टी आहेत. सर्व ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली असून एवढ्या मोठ्या ऑपरेशनला अगदी शांतीपूर्ण पद्धतीने पार पाडण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!