पुणे : शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. एनआयए, ईडी-सीबीआय आणि पोलिसांनी त्यांच्या संस्थेविरुद्ध नुकत्याच टाकलेल्या छाप्यांविरोधात पीएफआय कॅडर एकत्र आले होते. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देशभरात पीएफआयवर झालेल्या कारवाईनंतर पीएफआय कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. दरम्यान या घोषणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदुस्थानात गद्दारांच्या घोषणा खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली आहे.
सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “पुण्यात PFI वर राष्ट्रीय तपास यत्रंणेने (NIA) केलेल्या कारवाईच्या विरोधात निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, याचा मी जाहीर निषेध करतो. हिंदुस्थानात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा खपवून घेणार नाही. अशा देशद्रोही लोकांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. हा शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी खऱ्या अर्थाने सर्व जाती – धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली, आणि याच स्वराज्यात त्यांनी गद्दारांची काय गत केली होती ते ही सर्वांना माहिती आहेच.”
तर ते परत घरी जाणार नाहीत-
यापुढे कोणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावले, तर ते परत घरी जाणार नाहीत, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हे लोक आता विसरले असतील की महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. पीएफआयच्या समर्थनात काही नालायकानी पाकिस्तान जिंदाबादचे नारे पुण्यात दिले. देशाच्या विरुद्ध कोणी, असे नारे देत असेल तर अशा देशद्रोह्यांना शिक्षा झाली पाहिजे. राज्यातील हिंदूत्ववादी सरकारने या लोकांवर कारवाई करावी या लोकांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्यावी, असे राणे म्हणाले.
कारवाई करण्याचे आदेश-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील असा प्रकार खपवून घेणार नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यात खळबळ! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा #Pune pic.twitter.com/WwIVkIKsrK
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) September 24, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video | मातीची भांडी बनवणारी मांजर पाहून व्हाल थक्क, पहा ‘हा’ गोड व्हिडिओ
- पुण्यात खळबळ! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा
- Fashion Tips | ओव्हरसाईज टी-शर्ट ट्रेंडमध्ये, ‘या’ स्टाइल बनवतील तुमचा ड्रेसिंग सेन्स अधिक चांगला
- Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी आहारात ‘या’ फळांचा करा समावेश, होतील गुणकारी फायदे
- Nitesh Rane | “…तर ते परत घरी जाणार नाहीत”; पुण्यातील ‘त्या’ घोषणेबाजीनंतर नितेश राणेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

