मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन क्षेत्राला फटका बसला याच काळात चित्रपटगृह देखील बंद असल्याने अनेक कलाकार डिजिटल माध्यमाकडे वळाले. यातच आता आपल्या धडाकेबाज वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली अभिनेत्री कंगना रनौत देखील डिजिटल माध्यमातून एक निर्माती म्हणून पदार्पण करत आहे.
या चित्रपटाचे नाव ‘टिकू वेड्स शेरू’ असं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी देखील पाहायला मिळणार आहे. याबद्दल कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवाजुद्दीनचा एक फोटो शेअर करत ‘टीममध्ये आपलं स्वागत आहे, असे कंगना म्हणाली आहे.
https://www.instagram.com/p/CRRZ6FMFH1v/?utm_source=ig_web_copy_link
यासोबतच ‘मानिकार्निका’ फिल्म्सच्या इन्स्टाग्राम पेजवर लिहिलं की, ‘आमच्या टिकू वेड्स शेरूच्या टीममध्ये या पिढीतील एका सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा समावेश झाला आहे’. आम्हाला आमचा वाघ मिळाला आहे, त्यामुळे आम्हाला खुपचं अभिमान वाटतं आहे’. ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट अनोखा असणार आहे. या चित्रपटाचं शुटींग लवकरच सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘१४,००० धावांचा विक्रम कर्णधार पोलार्डला समर्पीत’, – ख्रिस गेल
- नवख्या इंग्लंडकडुन पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरच्या सामन्यात ३ गडी राखुन विजय
- ‘मुंबईची २०२४ पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीने मार्गी लावा’
- ‘तुमचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?’; वाचा नारायण राणे यांचं खास पत्र
- अखेर अंनिसच्या मागणीला यश ! कथित राजकीय गुरु येमुलवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल


