मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाने सलग तिसरा एकदिवसीय सामना गमावला आहे. पाकिस्तानने दिलेल्या ३३१ धावांचे लक्ष्य नवख्या इंग्लंडच्या संघाने ७ गडी गमावुन पार केले. जेम्स व्हिन्सला सामनावीर आणि साकिब महमुदला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी साठी पाचारण केले. मागील दोन सामन्यात पाकिस्तानच्या अपयशी फलंदाजानी या सामन्यात चांगली कामगीरी करत निर्धारीत ५० षटकात ९ गडी गमावत ३३१ धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानकडुन कर्णधार बाबर आझमने १३९ चेंडुत १४ चौकार आणि ४ षटकारासंह सर्वाधीक १५८ धावांची शतकी खेळी केली. तर इंग्लंडकडुन या डावात ब्रायडन कार्सने सर्वाधीक ५ गडी बाद केले.
England win in Edgbaston & take the series 3-0 ????????????????????????????
James Vince and Lewis Gregory's crucial 129 run partnership laying the foundation for a thrilling run chase.
#ENGvPAK | https://t.co/wt6TEMLTGd pic.twitter.com/A3liDw5W2u— ICC (@ICC) July 13, 2021
प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने ७ गडी गमावत ४८ षटकातंच हे लक्ष्य पार केले. यासह इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली. इंग्लंडकडुन जेम्स व्हिन्सने ९५ चेंडुत ११ चौकारासह सर्वाधीक १०२ धावांची शतकी खेळी केली. तर पाकिस्तानकडून हरीस रौफने सर्वाधीक ४ गडी बाद केले. यासह तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने पाकिस्तानला व्हाइटवॉश दिला आहे. १६ जुलै रोजी टी-२० मालिकेला सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुंबईची २०२४ पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीने मार्गी लावा’
- ‘तुमचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?’; वाचा नारायण राणे यांचं खास पत्र
- अखेर अंनिसच्या मागणीला यश ! कथित राजकीय गुरु येमुलवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल
- ‘इंदुरीकर त्यांच्या कीर्तनातून महिलांबाबत बदनामीकारक विधान करत होते तेव्हा ही कुठे होती ?’
- नाना पटोलेंसारख्या जबाबदार व्यक्तीने बेताल वक्तव्य करू नये; सुनिल शेळकेंनी सुनावलं


