🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना चांगलंच सुनावलं आहे.
राज्यपालांच्या सडक्या मेंदूमागे कोण आहे?, असा सवाल करत अधिक चांगला वृद्धाश्रम असेल, तर राज्यपाल कोश्यारी यांना तिकडे पाठवा, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लगावला. “त्यांना राज्यपाल म्हणण मी सोडून दिलंय. कारण राज्यपाल पदाची झुल पांघरली म्हणजे त्यांनी काहीही वेडवाकडं बोलावं. हे काही महाराष्ट्र मान्य करणार नाही”, असंही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत.
ते म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. साधारणता एक प्रघात आहे की, ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांचीच माणसं किंवा त्यांच्याच विचारसरणीची माणसं देशातील विविध राज्यात किंवा सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते?”
पुढे ते म्हणाले, जरासा एक शब्द वापरतोय कुणी गैरसमज करू नये, म्हणजे खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल मी बोलतो आहे. ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा सुद्धा एक प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे आणि राज्यपाल नियुक्तीचे निकष सुद्धा ठरवायला पाहिजेत, असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
- Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ हळदीचे फेस पॅक
- ANIS | मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेची प्रतिक्रिया; म्हणाले,
- Pakisthan Army chief | लेफ्टनंट जनरल सय्यद आसिम मुनीर घेणार पाकिस्तान लष्कर प्रमुखाची जागा
- Sharad Pawar | “…तरच पुढची चर्चा होऊ शकते”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचे खडेबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
