🕒 1 min read
मुंबई- परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.
राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.
वादळी पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागांत प्रचंड नुकसान केलं आहे.अनेक वस्त्यांत पाणी गेलं, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. @CMOMaharashtra @OfficeofUT यांनी लोकांना दिलासा देण्यासाठी या भागाचा दौरा करावा व आपत्ती व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन लोकांना काय रिलीफ देणार आहात हे जाहीर करावं. pic.twitter.com/qdWJLUy46J
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 17, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून राज्याचा दौरा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापैकी काही भागांचा दौरा करावा. जेणेकरून येथील लोकांना दिलासा मिळेल. तसेच आपातकालीन व्यवस्थापनासोबत तातडीने बैठक घेऊन काय मदत करणार, हेदेखील जाहीर करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- राज्यात ‘रामलीला’ आयोजनाची परवानगी द्यावी, राम कदमांचं ठाकरेंना पत्र
- महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- ‘पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कोरोना परिस्थिती हाताळली’
- …अखेर कार्तिकने कर्णधारपद सोडलं ; आता ‘हा’ खेळाडू बनला केकेआरचा कर्णधार
- झिंटा टीम जिंकली का? सलमान खानचे ट्विट व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
