🕒 1 min read
मुंबई – कृष्णा उपखोऱ्यातील सांगली, कोल्हापूर ही दोन शहरे व नदीकाठची गावे पुराच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. मागील दोन दिवसांपासून या भागात प्रचंड पाऊस होत आहे. आणखी दोन दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
कोयना धरणातून ३५००० क्युसेक्स व इतर धरणातून ८००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मात्र पाऊस जास्त असल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कृष्णेची पाणी पातळी सध्या २९ फुट आहे मात्र ती संध्याकाळपर्यंत ३८ ते ४० फुट इतकी होऊ शकते असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर सांगली शहर व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन व पूर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर शहर व परिसरातील भागांना सध्या धोका नाही असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
भिमा खोऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे.मागील २४ तासात येथे १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात सामान्य स्थिती आहे मात्र निरा, नरसिंहपूर व सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणामधून रात्री ११.३० ते पहाटे ५ यादरम्यान २५०००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. सद्यस्थितीत उजनी धरणातून १४०००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे.निरा-नरसिंहपुर या ठिकाणी सकाळी ९ वाजता ३१२००० क्युसेक्स इतका विसर्ग होता. या ठिकाणी सद्यस्थितीत दुपारी २ वाजता २७५००० क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. सर्व नागरिकांना प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर येथील नागरिकांनी विशेषतः खबरदारी घ्यावी असेही आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- ठाकरे साहेब …शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरला , किमान डोळयाचे अश्रू तरी बघा ?
- शेतकरी संकटात असताना घरात बसून कारभार चालविणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर मनसेची जहरी टीका
- ‘मुख्यमंत्री ठाकरे घराच्या बाहेर या तरच तुम्हाला महाराष्ट्राची खरी परिस्थिती कळेल’
- ‘पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना मंत्री मंडळात राहण्याचा अधिकार नाही’
- जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर अजित पवारांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
