🕒 1 min read
नवी दिल्ली- काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचं म्हणत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये आयएमएफच्या आकड्यांच्या संदर्भा दिला आहे. त्यांनी एक ग्राफ शेअर केला असून त्यामध्ये भारताचा जीडीपी 10.30 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Another solid achievement by the BJP government.
Even Pakistan and Afghanistan handled Covid better than India. pic.twitter.com/C2kILrvWUG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 16, 2020
राहुल गांधी यांनी शुक्रवारी (16 ऑक्टोबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केलं आहे. तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कोरोना परिस्थिती हाताळल्याचं म्हटलं आहे. भाजपा सरकारची आणखी एक जबरदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कोरोना परिस्थिती हाताळली आहे असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. यासोबत राहुल यांनी आयएमएफच्या आकड्यांच्या संदर्भ देखील दिला आहे.
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये आयएमएफच्या आकड्यांच्या संदर्भ देऊन एक ग्राफ शेअर केला असून त्यामध्ये भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या ग्राफमध्ये करोनाच्या कालावधीमध्ये बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, चीन आणि भूतानच्या जीडीपीमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. तर भारताचा जीडीपी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या जीडीपीपेक्षा अधिक प्रमाणात घसरल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- पवार कुटुंबियावर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत : सुप्रिया सुळे
- महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- ‘मुख्यमंत्री ठाकरे घराच्या बाहेर या तरच तुम्हाला महाराष्ट्राची खरी परिस्थिती कळेल’
- ‘पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना मंत्री मंडळात राहण्याचा अधिकार नाही’
- जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर अजित पवारांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
