मुंबई : दसरा मेळाव्यावरुन वारंवार वाद पेटत आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दसरा मेळावा करीता जोरदार तयारी करत आहेत. काही दिवसांपुर्वीच दसरा मेळावा शिंदे गट घेणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. अशातच शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिक यांना तयारी लागण्याचा आदेश दिला आहे. या पार्श्वभूमिवर शिवतीर्थावर आता शिंदे गट आणि ठाकरे गटांचा जोरदार राडा होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आदेशः
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह शिवसेना भावनात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये दसरा मेळावा संदर्भात अनेक नेत्यांसोबत सूचना करत आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता महिला आघाडी, युवा सेना, शिवसेनिकांसोबत घ्या असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
बंड केलेल्या आमदारांवर केली टीकाः
यादरम्यान, बंड केलेल्या आमदारांवर देखील उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्यावा. फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल, तसेच विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख सोबत असल्याने आत्मविश्वास दुणावल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं असून शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचाही आदेश उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
दरम्यान, वेदांत फॉक्सकाॅन प्रकल्पावर सुरू असलेल्या राजकीय वादामध्ये उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. प्रकल्प राज्यात आणण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सरकारने खूप प्रयत्न केले, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Eggless Mayonnaise Recipe | घरी अंड्याशिवाय मेयोनीज कसे बनवायचे, जाणून घ्या रेसिपी..!
- Hair Tips | केस गळती थांबवायची असेल तर वापरा ‘हे’ घरघुटी उपाय…
- Nana Patole | नरेंद्र मोदींच्या वाढदिवसा दिवशी नाना पटोलेंनी केले गंभीर आरोप, म्हणाले…
- JIO VS AIRTEL | जिओ ने पुन्हा एअरटेल आणि VI ला टाकले मागे, एकाच महिन्यात जोडले इतके नवीन वापरकर्ते
- Amit Shaha | अमित शहांच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा हलर्जीपणा शहांच्या गाडीसमोर TRS नेत्याने ताफ्या सोमर केली गाडी पार्क


