🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज एकनाथ शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत आंदोलन करण्यात आलं. यात ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा करण्यात आला. तसंच ठाकरेंची ‘दिशा’ नेहमीच चुकली, असा टोलाही लगावण्यात आला. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी जी माझ्याविरोधात बॅनरबाजी केली ते पाहून मला त्यांची किव येते. संघातील ज्या खेळाडूची आपल्याला भीती असते त्याच्याच विरोधात स्लेजिंग केली जाते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसून येत आहे. म्हणूनच माझ्याविरोधात अशी घोषणाबाजी केली जात आहे. हे रामराज्य नसून रावण राज्य आहे. मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात आंदोलन केलं जात आहे”, असा जोरदार हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांवर केला.
महत्वाच्या बातम्या :
- Manisha Kayande | “8 वेळा दिल्लीच्या वाऱ्या केल्या…”, एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांचा हल्लाबोल
- Maharashtra Assembly | औरंगाबाद, उस्मानाबाद शहरासह नवी मुंबई विमानतळ नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर
- Assembly Session 2022 | भाई जगताप सभागृहात कडाडले, दादा भुसे यांचे प्रत्युत्तर
- Nitesh Rane | “चपट्या पायांचे उद्धव ठाकरे यांच्यामुळे…”, नितेश राणे यांची बोचरी टीका
- Assembly Session 2022 | आदित्य ठाकरेंच्या एका वाक्यावर प्रचंड गदारोळ ; मुनगंटीवार-जयंत पाटीलही भिडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
